तरच महाराष्ट्रात १२ जूनला येईल मॉन्सून..!

पुणे :

यंदा सरासरीनुसार देशभरात चांगला पाऊस होण्याचे संकेत हवामान विभागासह काही खासगी कंपन्यांनी दिले आहेत. मात्र, त्याचवेळी मॉन्सूनपूर्व पाऊस झालेला नसतानाच हवामान बदलाच्या झटक्याने मॉन्सूनचा हंगाम दुरावला आहे. अशावेळी पुढील ६-७ जूनला केरळ राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले तरच १२-१३ जूनला महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होईल. मात्र, असे न झाल्यास दुष्काळाचा कालावधी वाढण्याची भीती आहे.

पुढील चार दिवसांत केरळ राज्यात मॉन्सूनचा पाऊस नक्की येईल अशी हवामान विभागाला आशा आहे. तर, राज्यातही उन्हाचा चटका वाढण्यासह पावसाचे ढग दिसायला लागले आहेत. काही भागात मॉन्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत आहे. त्याचे उत्साहात स्वागत नागरिक व शेतकरी करीत आहेत. मात्र, तरीही अधिकृतरीत्या मॉन्सून कधी येणार याचेच कोडे सगळ्यांना पडले आहे. १३ जूनपर्यंत राज्यात पाऊस दाखल झाल्यास मुग व उडीद याच्या पेरण्यांना वेग येईल. नाहीतर या दोन्ही कडधान्य पिकांचा हंगाम यंदा वाया जाण्याची भीती आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*