नभ उतरू येऊ दे, पाऊस पडू दे; शेतकऱ्यांची अपेक्षा

पुणे :

राज्यात ढगाळ हवामानाचे आगमन झाल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. मात्र, आकाशात दिसणारे हे ढग पाऊस कधी देणार आणि उन्हाची धग कायमस्वरूपी आठमाही कधी कमी होणार, असेच कोडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पडले आहे.

काळापर्यंत ४५ अंश सेल्सिअस यापेक्षा काही ठिकाणी तापमान होते. अशावेळी पाऊस पडून एकदाचा दिलासा मिळावा अशीच भावना शेतकरी व सामान्य जनतेची आहे. दुष्काळी स्थिती हटविण्यासाठी फक्त पाऊस हाच पर्याय असून तो यावा यासाठी शेतकरी आभाळाला साकडे घालीत आहेत. ढगाळ हवामानात पावसाची शक्यता वाढल्याने आता सगळेजण त्याची चातकासारखी वाट पाहत आहेत.

मागील आठवड्यात कोपरगाव, राहुरी, परभणी, अमरावती, सिंधुदुर्ग, नांदेड, लातूर, जामखेड आदी भागात मान्सूनपूर्व वाळीवाचा पाऊस बरसला आहे. यंदा हवामान विभागाने मॉन्सून पाऊस चांगला होण्याचा अंदाज दिल्याने दुष्काळी भाग अच्छे दिन येण्याची वाट पाहत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*