मुख्यमंत्र्यांनी घेतला खरीपाचा आढावा

मुंबई :

दुष्काळी भागाला पावसाचे वेध लागलेले असतानच राज्यातील सर्व राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यातच वेळात वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आगामी खरीप हंगामाचा सविस्तरपणे आढावा घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या.

पीकनिहाय व विभागनिहाय माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांनी आगामी खरीपात शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आदेश राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत घेतला. यावेळी सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, प्रशासकीय अधिकारी, कृषी विभागातील प्रमुख अधिकारी व मोहीम राबविणाऱ्या यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*