राहुरी कृषी विद्यापीठाच्या ८ वाणांना मान्यता

अहमदनगर :

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ८ पिकाच्या वाणांसह एक यंत्र आणि ४७ शिफारशींना कृषी संशोधन व विकास समितीने मान्यता दिली आहे. तीन दिवसीय परिषदेत ही मान्यता मिळाल्याची माहिती कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी दिली.

प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी म्हटले आहे की, परिषदेला महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, अकोला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विकास भाले, परभणीचे डॉ. अशोक ढवन, दापोलीचे डॉ. संजय सावंत, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी परिषदेचे महासंचालक महेंद्र वारभुवन, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्यासह प्रमुख अधिकारी व संशोधक उपस्थित होते.

उस फुले ९०५७ (को १२०८५), संकरीत कापूस फुले माही, भुईमूग फुले धनी, नाचणी फुले कासारी, बोर फुले शबरी, डबल बीन / लायामा बीन फुले सुवर्ण, मेथी फुले कस्तुरी, निशिगंध फुले रजत ही पिकाची वाण अर्थात नवीन जाती आणि फुले हायड्रो मेकानिक नियंत्रित तण काढणी यंत्र यासह ४७ शिफारशींना या परिषदेत मान्यता मिळाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*