शेतकऱ्यांच्या हाती अॅग्रीक्लाउड जादूची कांडी..!

पणजी :

देशाच्या पर्यटन नकाशाची आंतरराष्ट्रीय राजधानी म्हणून लौकिक मिळवलेल्या गोवा राज्यातही शेतीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.. या छोटेखानी राज्यातील शेतकरी ‘अॅग्रीक्लाउड’च्या (Agricloud) मार्फत जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय येथील राज्य सरकारने घेतला आहे.

गोव्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी येथील महत्वपूर्ण प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे. कृषी मंत्रालय आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून हे अॅग्रीक्लाउड ही संगणकीय प्रणाली काम करणार आहे. शेतकरी आपल्या स्मार्टफोनद्वारे याचा सहजपणे वापर करू शकतील. स्थानिक हवामान, मार्केट अपडेट, पिक सल्ला यासह शेतकऱ्यांच्या उत्पादित माल विक्री करण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*