अॅग्रोस्टारच्या शेतकऱ्यांना मिळणार अचूक पिक व हवामान सल्ला

पुणे :

महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना माफक रेटमध्ये कृषीनिविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या अॅग्रोस्टार कंपनीने आता शेतकऱ्यांना अचूक पिक व हवामान सल्ला देण्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. अमेरिकेतील आयबीएम बिझनेस या कंपनीच्या मदतीने यापुढे स्थानिक हवामानानुसार पिक व किडरोग व्यवस्थापन सल्ला कंपनी शेतकऱ्यांना देणार आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुरू झालेल्या अॅग्रोस्टार कंपनीने मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी किमतीत दर्जेदार कृषीनिविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठीचे मोठे काम हाती घेतालेले आहे. महाराष्ट्रातही लाखो शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशक, औषधे आणि यंत्रसामुग्री यांचा पुरवठा ही कंपनी थेट बांधावर जाऊन करीत आहे. तसेच कंपनीच्या मोबाईल अॅपद्वारे निविष्ठा खरेदीसह पिक सल्ला दिला जातो. त्यात आता आणखी अचूकता आणण्याच्या उद्देशाने कंपनीने आयबीएम बिझनेस कंपनीकडून हवामान सल्ला सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल, अशी अपेक्षा कंपनीचे संस्थापक शार्दुल शेठ यांनी व्यक्त केली आहे.

द हिंदू या लोकप्रिय इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीमध्ये शार्दुल शेठ यांनी म्हटले आहे की, भारतातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. शेतकऱ्यांना अचूक हवामान सल्ला मिळाल्यामुळे पिकावारिक किडरोग व्यवस्थापन तातडीने करणे शक्य होईल. अनेकदा प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करणे या हवामान सल्ल्यामुळे शक्य होईल. शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यासाठी यामुळे नक्कीच फायदा होईल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*