‘वायू’वेगाने येत आहे गुजरातवर संकट..!

मुंबई :

बंगालच्या उपसागरात फनी नावाच्या वादळाने उच्छाद घातल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता मुंबईसह गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर वेगाने वादळी संकट येत आहे. हवामान विभागाने वायू असे नाव दिलेल्या या वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

वायू वादळामुळे मुंबईत सोमवारी जोरदार पाऊस झाला. मॉन्सूनपूर्व पावसामुळे तेथील जनजीवन कोलमडले. गोव्यातही या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, आता वादळाची दिशा दीव-दमन यासह गुजराकडे वळली आहे. कोकण किनारपट्टी व मुंबईतही त्याचे परिणाम दिसू शकतील.

१४ जूनपर्यंत गुजरातच्या कच्छ आणि किनारपट्टीवर या वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता गृहीत धरून राज्य व केंद्र सरकारच्या यंत्रणा सज्ज आहेत. तसेच या कालावधीत वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे लगतच्या सुमारे २०० किलोमीटर भागात पाऊस होण्याचाही अंदाज आहे. या वादळाच्या प्रवासाचे संभावित चित्र स्कायमेट या खासगी हवामान अभ्यासक संस्थेने जरी केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*