कृत्रिम पावसासाठी उजाडणार जुलै महिना..!

पुणे :

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठीचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असतानाच आता राज्यभर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार आता निविदा प्रक्रिया राबविली जात असून जुलै महिन्यात औरंगाबाद येथून या महत्वाकांक्षी प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यात आहे.

मात्रालायातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या निविदा भरण्यात येत आहेत. उद्या या निविदा उघडण्यात येतील. दि. १५ जूनला यासाठीच्या कंपनीची निवड करण्यात येईल. त्यानुसार राज्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून औरंगाबाद किंवा सोलापूर येथून विमानाचे उड्डाण करण्यासाठीची कार्यवाही १ जुलैपर्यंत पूर्ण होईल. याचे डॉपलर रडार त्या ठिकाणावर पोहोचविण्याची सोय २० तारखेच्या नंतर केली जाणार आहे. एकूणच जुलै महिन्यात राज्यात कृत्रिम पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*