सरकारी निर्णयाचा झटका; कांदा उत्पादकांना फटका

नाशिक :

कांद्याचे वाढते भाव उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक अनुभूती देण्याची शक्यता असतानाच विदेश व्यापार विभागाने कांदा निर्यात अनुदानास मुदतवाढ न देण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने बाजारात कांद्याचे भाव सरासरी १०० रुपये क्विंटलने कमी झाले आहेत.

मुंबई मार्केट कमिटीत कालच्या तुलनेत सरासरी १००-१२० रुपयांनी भाव कमी झाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. राज्यभरात सगळीकडेच कालच्या १०० ते १५० रुपयांनी कांद्याचे भाव पडले आहेत. त्यामुळे उत्पादकांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणूक संपली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी मिळाल्याने हे कांदा निर्यातीवरील १० टक्के प्रोत्साहन अनुदान कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, मोदी सरकारने ही अपेक्षा फोल ठरविल्याची भावना कांदा उत्पादकांची आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*