शहरात होतोय, पण गावाकडे होईना पाऊस

अहमदनगर:

शहरात आणि नजीकच्या भागात तुलनेने जास्त पाऊस पडत असतानाच गावाकडे शेतात मात्र कमी पाऊस होत असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भीषण दुष्काळ, जनावरांसाठी सुरू झालेल्या चारा छावण्या अशी कडकी अवस्था बळीराजाची होती. यातच एक पाऊस झाला, पहिला पाऊस म्हणत नगरच्या शहरवासीयांनी ऊड्या मारल्या पण बळीराजा मात्र डोक्याला हात लावून रानाकडे बघत बसला होता. कारण हा पहिला पाऊस वादळी होता. या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याची सुद्धा भिती आहे. यानंतर आता पाऊस होणार अशी अपेक्षा असताना वादळामुळे पाऊस लांबणीवर गेला आहे. जर येत्या ३-४ दिवसात पाऊस झाला नाही तर खरीप हंगामाचे क्षेत्र घटू शकते. मूग, वाटाणा, सोयाबीन, उडीद, कापुस अशी अनेक पिके घेतली जाणार नाहीत. हि पिके घेतली आणि रोग पडला तर दुष्काळात तेरावा महिना अशी गत होईन. त्यामुळे शेतकरी हि पिके घ्यायचे टाळत आहेत.

खरीप हंगामातील ही पिके ऊशीरा घेतल्यास रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांनी हे पिके घेण्याचे नियोजन केले. बियाने, खते याचे नियोजन केले, पैशांची गुंतवणूक केली. तेही अडचणीत सापडले आहेत. शेती करा तरीही मरण आणि नाही केली तरीही मरण अशी बिकट अवस्था झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*