तब्बल चार दशकांची प्रतीक्षा संपली

अहमदनगर :

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे काम ४७ वर्षांपूर्वी चालू झाले. काही अडथळ्यांमुळे काम थांबले ते थांबलेच दर निवडणुकीला निळवंडेचा प्रश्न समोर यायचा. लोकप्रतिनिधी निळवंडे धरणाचे काम सुरू असं आश्वासन गेली सहा सात निवडणुकांमधे देत होते. निळवंडे धरणावरून राजकारण पेटले, विझले. राजकारण करणार्यांचे काम झाले पण निळवंडेचे काम काही झाले नाही पण अखेरीस भीषण दुष्काळात मुहूर्त सापडला आहे.

कालव्याचे खोदकाम सुरू झाले आहे. ज्यांच्या जमिनी कालव्याच्या कामात गेल्या आहेत. त्यांना योग्य मोबदला भेटला आहे. तरिही मोठ्या पोलिस बंदोबस्तात काम सुरू झाले आहे. ज्या शेतकर्यांचा विविध कारणांमुळे धरणाला विरोध होता. तो विरोधही आता शांत झाल्याचे चित्र होते.

काल (बुधवारी) पाटबंधारे- जलसंपदा अधिकारी दोन पोकलेन, चार टिपर, जेसीबी, डंपर घेऊन आले आणि कामाला सुरूवात झाली. निळवंडे धरणाचे हे काम यापूर्वी पूर्ण झाले असते तर या भीषण दुष्काळातही शेती सुजलाम सुफलाम होऊ शकली असती. पण देर आये दुरूस्त आये या उक्तीप्रमाणे काम मोठ्या गतीने सुरू झाले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*