महिंद्रा कंपनीची स्विसमधील शेती कंपनीत गुंतवणूक

मुंबई :

देशातील अग्रगण्य कंपनी म्हणून लौकिक मिळविलेल्या महिंद्रा कंपनीने स्वित्झर्लंड येथील गमया (GAMAYA) कंपनीमध्ये ११.२५ टक्के शेअर खरेदी केले आहेत. गमया ही कंपनी भारतासह ब्राझील, उक्रेन आणि इतर काही देशांमध्ये शेतकऱ्यांना अचूक पिक सल्ला सेवा देत आहे.

महिंद्रा कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टर विभागाचे प्रेसिडेंट राजेश जेजुरीकर यांनी याबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या प्रगतीसाठी महिंद्रा कंपनी काम करीत आहे. अशावेळी अचूक पिक सल्ला आणि मार्गदर्शन देणाऱ्या कंपनीमुळे शेतकऱ्यांचा निश्चित चांगला फायदा होईल. यातील तंत्रज्ञानाची गरज आणि भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मूळ इंग्रजी बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा :

https://www.business-standard.com/article/companies/mahindra-pick-up-11-25-stake-in-swiss-agriculture-technology-firm-gamaya-119061401177_1.html

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*