गोसेवेसाठी प्रत्येकी २५ लाख अनुदान

मुंबई :
गोवर्धन आणि गोसेवा केंद्रासाठी राज्यातील १३९ केंद्रांना २५ लाख प्रत्येकी अनुदान दिले जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली.

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडताना सर्व घटकांना खुश करण्यासह धार्मिक अजेंडा राबविण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भर कायम ठेवला आहे. देशी गायींच्या संवर्धनातून शेती व ग्रामीण भागाचा कायापालट होण्याची सरकारची अपेक्षा पूर्ण झाल्यावरच या खर्चाला खरे फळ येणार आहे. नाहीतर गायी व पुरोहित (मासिक ६ हजार अनुदान) यांच्याकडे लक्ष देताना शेतकरी दुर्लक्षित राहू न देण्याची अपेक्षा ग्रामीण भाग व्यक्त करीत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*