कांदा उत्पादकांसाठी ३९० कोटी; अर्थसंकल्पात घोषणा

मुंबई :

राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात शेतकरी वर्गाला ठोस काहीही न देता आकडेवारीनुसार खुश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. त्यानुसार कांदा अनुदानापोटी ३९० कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान मागे घेतल्याने बाजारात मंदी आलेली आहे. मात्र, त्यावर काहीही न बोलता हे तुटपुंजे अनुदान देत प्रश्न दुर्लक्षित केल्याची भावना उत्पादक शेतकरी वर्गाची आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा करून निवडणुकीसाठी रान तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी ११४ कोटी अनुदान दिल्यानंतर आताही हे अनुदान पुढे सुरू ठेवण्यासाठी ३९० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*