राज्याच्या स्थूल उत्पन्नात चार वर्षांत १० लाख कोटी वाढ..!

मुंबई :
राज्याच्या १६ लाख ४९ हजार ६४७ कोटी रुपयांच्या स्थुल राज्य उत्पन्नात चार वर्षात १० लाख कोटी रुपयांनी वाढ होऊन ते २६ लाख ६० हजार ३१८ कोटी रुपये झाल्याचे सांगतांना राज्य विकासाच्या या प्रक्रियेत शेती, शेतकरी आणि सामान्य माणूस हा राज्य विकासाचा “गाभा” असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत राज्याचा २०१९-२० अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, सन २००९-१० ला कर्जावरील व्याजापोटी आपण स्थुल राज्य उत्पन्नाच्या १७.०७ टक्के खर्च करत होतो त्यावर आपण नियंत्रण मिळवले असून हा खर्च ११.१९ टक्क्यांवर आणला आहे. राज्याची महसूली तूट दोन वर्षात नियंत्रित ठेवण्यात आपल्याला यश मिळाले आहे. गेल्यावर्षी राज्य २०८२ कोटी रुपयांच्या महसूली अधिक्यात आले. यावर्षी अखेर ही राज्य महसूली अधिक्यात येईल असा विश्वास वाटत असल्याचेही ते म्हणाले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*