शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार : मुनगंटीवार

मुंबई :
सन २०२२ पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मागील चार वर्षात शासनाने सिंचन, मृद व जलसंधारण, कृषी व पदुम क्षेत्रात अनेक महत्वाच्या उपाययोजना राबविल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. जलसंपदा विभागाच्या विविध योजनांसाठी राज्य अर्थसंकल्पात १२ हजार ५९७ कोटी १३ लाख ८९ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी दिली.

जलसंपदा विभागासाठी १२ हजार ५९७ कोटी रुपयांची तरतूद
सिंचन योजनांची माहिती देतांना ते म्हणाले की, मागील साडे चार वर्षात ३ लाख ८७ हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता आणि १ हजार ९०५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. मागील साडे चार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पूर्ण केल्याचे ही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेसाठी चालू वित्तीय वर्षात २ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील २६ अपुर्ण सिंचन प्रकल्पांचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत करण्यात आला आहे. या प्रकल्पांची किंमत २२ हजार ३९८ कोटी रुपये आहे.

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी ६ हजार ४१० कोटी रुपयांची तरतूद
नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी ६ हजार ४१० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात उपलब्ध करून देण्यात आला असून आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली.

बळीराजा जलसंजीवनी योजनेसाठी या आर्थिक वर्षात १ हजार ५३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातील सिंचन प्रकल्पांच्या कालबद्ध पुर्णत्वासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरु केल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. खुल्या कालव्या ऐवजी नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन धोरण अंमलात आणल्याने भुसंपादनाच्या खर्चात बचत होत असल्याचे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, १०९ सिंचन प्रकल्पांच्या ६.१५ लाख हेक्टर सिंचन क्षेत्रावर नलिका वितरण प्रणालीने कामे करण्याचे प्रस्तावित आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*