‘मागेल त्याला देऊ शेततळे’; रोहयोसाठी ३०० कोटी..!

मुंबई :
रोजगार निर्मितीमध्ये कृषी क्षेत्राचे असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन सुक्ष्म सिंचनासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील २ हजार ६५ महसूल मंडळापैकी २ हजार ६१ महसूल मंडळात स्वंयचलित हवामान केंद्राची यशस्वीरित्या उभारणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार यांनी दिली.

मृद व जलसंधारणासाठी ३ हजार १८२ कोटी रुपये
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या २२ हजार ५९० गावांपैकी १८ हजार ६४९ गावांमध्ये पाण्याच्या ताळेबंदानुसार निश्चित करण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या गावांमध्ये ६ लाख २ हजार मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण झाली असून २६.९० टीएमसी पाणी क्षमता निर्माण झाली आहे. योजनेवर आतापर्यंत ८ हजार ९४६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून ५ हजार २७० जलाशयातून ३.२३ कोटी घनमीटर गाळ उपसण्यात आला. ज्याचा ३१ हजार १५० शेतकऱ्यांनी लाभ घेतला. २०१८-१९ या वित्तीय वर्षात मृद व जलसंधारणासाठी ३ हजार १८२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

रोहयोसाठी ३०० कोटी
मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत मागील चार वर्षात योजनेतून १ लाख ६७ हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. २०१९-२० या वर्षात २५ हजार शेततळी पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत विविध विभागाच्या समन्वयातून करावयाच्या कुशल खर्चासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी या आर्थिक वर्षात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*