Blog | आदिवासींची झिंगवणारी पेयं..!

जगभरातल्या आदिवासींचे एक कौटूंबिक पेय असते. पेयाची संकल्पना त्यांच्या संस्कृतीवर अधारलेली असते. केनियातील मसाई आदिवासी गाईचे कच्चे रक्त पितात. तिकडे विवाह सोहळा व आनंद साजरा करण्यासाठी गाईचे रक्त पिले जाते. न्यु जिनीवा येथे सांबिया नावाची आदिवासी जमात आहे. सांबिया जमातीतील मुले ७ वर्षांची झाल्यानंतर त्यांना घराबाहेर काढले जाते. घराबाहेर काढलेली मुले पुरुषांच्या घोळक्यात वाढतात. मुले वयात आल्यानंतर त्यांना त्यांच्याच कुटूंबातील एका व्यक्तीचे वीर्य पाजले जाते. वीर्यामुळे मुले प्रौढ व मस्क्युलर होत असल्याची धारणा सांबिया जनतेत आहे.

भारतातील आदिवासींची पेयं नवसागरयुक्त असतात. विवाहसोहळा, होळी व विविध आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी या पेयांचा उपयोग केला जातो. आदिवासी कुटूंबातील सदस्य नवसागरयुक्त पेयांचा आनंद लुटतात.

मेझींग आदिवासींची अपॉंग बियर
असाममध्ये मेझिंग व आदी नावाची आदिवासी जमात आहे. गेल्या अनेक शतकांपासून या जमाती अपॉंग नावाची बियर तयार करत आहेत. अपॉंग बियर तयार करण्यासाठी तांदळाचा उपयोग केला जातो. तांदळात विविध प्रकारची ३० झाडे व बांबुचा धुर मिक्स करुन अपॉंग बनवले जाते. विवाह व विविध समारंभात अपॉंगचा आनंद घेतला जातो.

झारखंडची हंडीया
झारखंड मधील आदिवासी जनता हंडीया नावाचे अल्कहोलीक पेय बनवतात. झारखंड, बिहार, ओरिसा, व पश्चिाम बंगालच्या पट्टयात हंडीया नावाचे अल्कहोलिक पेय प्रसिद्ध आहे. उकडलेले तांदुळ व विविध प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या माध्यमातून हंडीयाचे निर्माण केले जाते. प्राचीन काळापासून हंडीया आदिवासी संस्कृतीचा भाग आहे. उत्सव व विवाहाच्या दरम्यान स्थानिक देवाला हंडीया अर्पण केले जाते. त्यानंतर हे बांधव हंडीयाचा अस्वाद घेतात.

हिमाचलची लुगडी
हिमाचलच्या आदिवासी पट्टयात लुगडी नावाचे अल्कहोलयुक्त पेय बनवले जाते. प्रामुख्याने उन्हाळ्यात लुगडी बनवली जाते. शिजवलेल्या अन्नधान्यावर अंबविण्याची प्रक्रिया करुन लुगडी नावाचे पेय बनविले जाते. उन्हाळ्यात बनवलेल्या लुगडीचा अस्वाद पावसाळ्यात व हिवाळ्यात घेतला जातो. लुगडीमुळे शरीर उबदार राहते.

महाराष्ट्राची मोहाची दारू
महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील आदिवासी जमातींमध्ये मोहाच्या फुलांपासून अल्कहोलयुक्त पेय बनवले जाते. मोहाची दारू या नावाने महाराष्ट्रभर सदर पेय प्रसिद्ध आहे. फुले रापवून त्यापासून मोहाची दारु तयार केली जाते.

लेखक : विशाल केदारी
मो. क्र. : ७७१९८६००५८

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*