खुशखबर.. या सर्व योजनांचा लाभ मिळणार एकाच अर्जावर..!

मुंबई :
वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करून थकलेल्या शेतकऱ्यांना महायुतीच्या सरकारने एक आगळीवेगळी भेट दिली आहे. यापुढे एकाच अर्जावर महाडीबीटी पोर्टलच्या मदतीने सर्व (काही वैयक्तिक योजना वगळता) योजनांचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी याबतचे निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, पीक विमा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, दुष्काळी मदत या योजनांचा समावेश नव्यानेच विकसीत करण्यात येत असलेल्या महाडीबीटी पोर्टल करण्यात येणार आहे. कृषीविषयक सर्व योजनांचे लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना यापुढे एकच अर्ज करावा लागेल.

विधानभवनात कृषी विभागाच्या बैठकीत डॉ. बंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक विकास रस्तोगी यासह अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना कृषीविषयक योजनांची संपूर्ण माहिती व्हावी आणि योजनांमधील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करता यावे याकरिता ‘महाडीबीटी’ हे नव पोर्टल विकसीत करण्यात येत आहे.

विभागाच्यावतीने पोर्टलबाबत सादरीकरण यावेळी कृषीमंत्र्यांना करण्यात आले. महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा या पोर्टलमध्ये समावेश करता येईल याबद्दलही विचार करावा, अशी सूचना डॉ. बोंडे यांनी केली. या पोर्टलमध्ये सध्या ११ योजनांची माहिती संकलीत करण्यात आली आहे. यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक फळबाग योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना, बिरसा मुंडा कृषी स्वावलंबी योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबी योजना, दुष्काळी क्षेत्र विकास, राष्ट्रीय अन्नसुरक्षा, अन्नधान्य, तेलबिया, उस, कापूस, राष्ट्रीय कृषी विकास योजना(वयक्तीक लाभार्थी). या पोर्टलवर सर्वप्रथम शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*