कांदा बाजारभाव | सोलापूर १७७० तर, घोगरगावात १७५० रुपये

पुणे :

कांदा बाजारातील तेजीला सरकारी लगाम बसल्यानंतर आता बाजारात कांद्याचे भाव खूपच वरखाली होत आहेत. भाव कुठेही स्थिर नसताना सध्या काही ठिकाणी ग्रेड एकच्या कांद्याला बरा भाव मिळत आहे. गुरुवारी राज्यभरातील बाजारामध्ये सोलापूर बाजार समितीत १७७० रुपये आणि घोगरगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) बाजारात १७५० रुपये क्विंटल किमान भाव मिळाला.

राज्यभरातील प्रमुख बाजार समितीमधील कांद्याचे भाव असे (भाव कमाल-किमान-सरासरी प्रतिक्विंटलमध्ये) : कोल्हापूर ४००-१६००-१२००, औरंगाबाद ५००-१५००-१०००, मुंबई १२००-१६००-१४००, घोगरगाव (श्रीगोंदा) ३००-१७५०-८००, सातारा ७००-१४००-१०५०, सोलापूर १००-१७७०-९००, धुळे २५०-१३००-९००, नागपूर ९००-१३००-१२००, सांगली ४००-१७००-१०५०, पुणे ६००-१४००-११००, येवला ४००-१३९८-११२५, नाशिक ४००-१४५१-११००, लासलगाव ५००-१३७२-११५०, वांबोरी (राहुरी) ३००-१६००-१२५०, संगमनेर ५००-१६११-१०५०, पिंपळगाव बसवंत ४५०-१५०१-१२५१ आदि.

मॉन्सूनच्या आगमनामुळे सध्या बाजारात माल खरेदीला व्यापाऱ्यांनी महत्व दिले आहे. साठवण कातून पाऊस वाढला की दक्षिण भारतात कांदा विकण्याच्या नियोजनाने ही तयारी सुरू आहे. त्यामुळेच बाजारात भाव टिकून आहेत.

राज्यभरातील प्रमुख बाजार समितीमधील कांद्याचे भाव असे (भाव कमाल-किमान-सरासरी प्रतिक्विंटलमध्ये) : कोल्हापूर ४००-१६००-१२००, औरंगाबाद ५००-१५००-१०००, मुंबई १२००-१६००-१४००, घोगरगाव (श्रीगोंदा) ३००-१७५०-८००, सातारा ७००-१४००-१०५०, सोलापूर १००-१७७०-९००, धुळे २५०-१३००-९००, नागपूर ९००-१३००-१२००, सांगली ४००-१७००-१०५०, पुणे ६००-१४००-११००, येवला ४००-१३९८-११२५, नाशिक ४००-१४५१-११००, लासलगाव ५००-१३७२-११५०, वांबोरी (राहुरी) ३००-१६००-१२५०, संगमनेर ५००-१६११-१०५०, पिंपळगाव बसवंत ४५०-१५०१-१२५१ आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*