नाशिकच्या मार्केटप्रश्नी भुजबळ-खोत यांच्यात खडाजंगी; मुनगंटीवारांची मध्यस्थी

मुंबई :
नाशिकच्या टर्मिनल मार्केटबाबतच्या प्रश्नावर विधानसभा व विधानपरिषद यामध्ये वेगवेगळी उत्तर देऊन सरकार दिशाभूल करीत असल्याचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षात आणून दिला. त्यावर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली. मात्र, प्रसंगावधान राखून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्यस्थी करून चर्चेचा मार्ग खुला केला.

नाशिकमधील पिंप्री सय्यद येथे 2009 मध्ये टर्मिनल मार्केट ऊभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठीची 100 एकर जागा मंजूरही झाली होती. कृषी पणन विभागासाठी ही जागा मंजूर झाली होती. पण आता राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे उडवाउडवीची ऊत्तरे देत असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. याच विषयावर 2009 ला निर्णय झाला होता. त्यानंतर पाच वर्षे सरकारही तुमचेच होते तेव्हा काय झोपा काढत होते का, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला.

यावेळी संतापलेल्या भुजबळांनी विधानपरिषदेचा दाखला देत सांगितले की, 2017 मध्ये विधानपरिषदेच्या चर्चेत या विषयाला संमती भेटली होती. मग आता विधानपरिषदेला वेगळी आणि विधानसभेला वेगळी ऊत्तरे दिली तेव्हा तुम्ही झोपा काढत होते का, असा प्रतिसवाल करत भुजबळांनी हा प्रश्न राखुन ठेवण्याची मागणी केली. याचवेळी वित्त मंत्री मुनगंटीवार यांनी मध्यस्थी करत उपाध्यक्ष विजय औटी यांना हा प्रश्न राखुन ठेवण्याची विनंती केली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*