मराठवाड्यात खराखुरा मुळशी पॅटर्न

मुंबई :
मुळशी पॅटर्न या चित्रपटात ज्या पद्धतीने जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार झाले त्याच पद्धतीने मराठवाड्यात जमिनींच्या खरेदी विक्री प्रकरणात बेकायदेशीर व्यवहार झाला असल्याची शक्यता आहे. तसेच 2 लाख 6 हजार हेक्टरपैकी बहुतांश जमिनींचा मोठा घोटाळा उघाडकीस येऊ शकतो.

या जमिनी वतन, ईनाम, देवइनाम, गावठाण, गायरान आणि महार हाडोळा या जमिनींचे गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी स्थानिक पातळीवर आल्या आहेत. तसेच या संदर्भातील जमिनींचे व्यवहाराचे अहवाल प्रशासनाला सादर केलेला नाही. स्थानिक लोक आता या मराठवाडा पॅटर्नबाबत बोलू लागले आहेत. हा घोटाळा समोर आल्यास या दशकातील हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा असु शकतो. विधानसभा निवडणुकीत हा घोटाळा केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*