तंत्रज्ञान | शेतीविषयक माहितीसाठी वापरा हे मोबाईल अॅप

परंपरागत शेतीला आधुनिक कृषीतंत्र आणि योग्य विक्री तंत्राची सांगड घालूनच शेती नफ्यात येऊ शकते. सरकार असोत की खासगी संस्था, त्यांच्या योजना किंवा तंत्रज्ञानाने शेतीचा विकास व शेतकऱ्यांची उन्नती होत नसते. त्यासाठी जादूची कांडी अजूनही बनलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांनी सरकारी योजना, माहिती व संशोधन यांची माहिती घेऊन योग्य पद्धतीने त्या ज्ञानाचा उपयोग करून घेतल्यास नक्कीच शेती नफ्यात येऊ शकेल. त्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या काही महत्वाच्या मोबाईल अॅपची माहिती पुढे दिली आहे.

अ.क्रमोबाईल अॅपचे नावअॅपद्वारे उपलब्ध होणारी माहितीमोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची सुविधा स्थळ
1शेतकरी मासिक (Shetkari Masik)शेतकरी मासिकातील लेखगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
2(Maharain)मंडळ, तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरील आजचा,पर्यंतचा व सर्वसाधारण पाऊसमहारेन
3क्रॉप क्लिनिक (Crop clinic)सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या ५ पिकांच्या किडी व रोग व त्यांच्या उपाययोजना किडनाशके ट्रेड नेम व दुकानदाराची यादीmahaagriiqc.gov.in
4कृषि मित्र (Krishi mitra)तालुक्यातील खते, बियाणे, औषधे विक्रेत्यांची माहितीmahaagriiqc.gov.in
5एम किसान भारत (mKisan India)कृषि हवामान विषयक शेतीसाठी उपयुक्त सल्लेफार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
6किसान सुविधा (Kisan Suvidha)हवामान, कृषि निविष्ठा व्यापारी, बाजारभाव पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत मागणीगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
7पुसा कृषि (Pusa Krishi)पिकांच्या विविध जाती व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहितीगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
8क्रॉप इनशुरन्स (Crop Insurance)पिक विमा माहितीगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
9डिजीटल मंडी भारत & (Digital Mandi India)तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय बाजारसमितीचे शेतमालाचे दरगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
10अॅग्री मार्केट (AgriMarket)५० किमी परिसरातील शेती उत्पादनाचे बाजारभाव व जिल्हा/राज्य/देश पातळीवरील महत्तम दरगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
11पशु पोषण (Pashu Poshan)जनावराचे आहार विषयक मार्गदर्शनगुगल प्ले स्टोअर, फार्मर पोर्टल, एम किसान पोर्टल
12cotton (Kapus)कापूस लागवड तंत्रज्ञानाची माहितीगुगल प्ले स्टोअर
13एकात्मिक कीड व्यवस्थापन  (IPM)मुख्य पिकावरील कीड व्यवस्थापनाची माहितीगुगल प्ले स्टोअर
14हळद लागवड, (halad Lagwad)हळद लागवड, प्रक्रिया व तंत्रज्ञानाची माहितीगुगल प्ले स्टोअर
15पिक पोषण (Plant nutrition)पिकांसाठी अन्नद्रव्याची गरज, आवश्यकता कमतरतेची लक्षणे, अन्नद्रव्ये संवेदनशील पिके, सुक्ष्म अन्नद्रव्ये इ.बाबत माहितीगुगल प्ले स्टोअर
16लिंबू वर्गीय फळझाडांची लागवड (Citrus Cultivaiton)मोसंबी व लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत माहितीगुगल प्ले स्टोअर
17शेकरु (Shekaru)कृषि योजना, प्रदर्शने, प्रशिक्षण याबाबतची माहितीगुगल प्ले स्टोअर
18इफ्को किसान  (IFFCO Kisan)हवामान, बाजारसमिती दर, तज्ज्ञ, ज्ञानभांडार, सल्ला, बातम्या, बाजार प्रोफाईल, जॉब्स, व्हिडीओजगुगल प्ले स्टोअर
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*