म्हणून छावणीतुन दावणीकडे..!

अहमदनगर :
भयानक दुष्काळ असतानाही चारा छावण्या लवकर मंजुर होत नव्हत्या. फेब्रुवारीत कशाबशा छावण्या मंजूर झाल्या तर त्यातही पाच जनावरे न्यायला परवानगी होती. पण काहीच नसल्याने पाच तर पाच, पण पाच तरी जनावरांना अन्न-पाणी मिळाले. जनावरे छावणीत होती. लोकांना कामे नव्हती. आता जराशा पावसाने बळीराजाला जरा दिलासा मिळाला आहे. जी जनावरे छावणीत होती ती आता दावणीला चालली आहेत.

पेरण्या सुरू झाल्या आहेत. अहमदनगर मधील विवाध ठिकाणी समाधानकारक पावसामुळे छावणीतील जनावरे बाहेर पडली आहेत. तरीही यानंतरही छावण्या चालू ठेऊ असे सरकारने सांगितल्यामुळे बळीराजा अजुनच खुश आहे. अर्थात हा पाऊस पुरेसा नसला तरी हाताला काम आणि मनाला समाधान देणारा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*