बचतगटांना ९० टक्के अनुदानावर टॅक्‍टर..!

अहमदनगर :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‍अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहायता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर याचा पुरवठा करण्‍यात येत होता परंतू आता या योजनेअंतर्गत स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने कल्टिव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलरची खरेदी स्वत: लाभार्थी बचत गटांना देण्यात आलेली आहे.

स्‍वयंसहाय्य बचतगटांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्ती ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. परंतु त्याची कमाल किंमत ही ३ लाख १५ हजार रुपये यापेक्षा जास्त नसावी. त्याची किंमत ही अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम ही बचत गटांना स्वत: खर्च करावी लागेल असे निर्देश देण्यात आलेले आहे.

सन २०१९-२०१० या आथिर्क वर्षाकरीता ज्या बचत गटांना या योजनेचा लाभ घ्यायचे असेल अशा बचत गटांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग (अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, नगर-मनमाड रोड) अहमदनगर येथे विनामुल्य उपलब्ध आहेत, असे आवाहन श्री. पांडूरंग वाबळे (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर) यांनी केले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*