Blog | पथदर्शक शेत चाचणी प्रयोग

सप्रेम नमस्कार,
शेतकरी संघटनेच्या वतीने जीएम तंत्रज्ञानाचे शेतातील चाचणी प्रयोग करून तुलनात्मक अभ्यास करून त्याचे निष्कर्ष वैज्ञानिकांच्या कडून तपासून घेऊन शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी चाचणी प्रयोग थांबले आहेत. आता नाईलाजाने शेतकर्‍यांनाच हे प्रयोग करणे भाग आहे. प्रगतशील अभ्यासूू शेतकर्‍यांनी स्वेच्छेेने, स्वजबाबदारीवर हे काम करावे अशी अपेक्षा आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या विविध तर्‍हेच्या बियाणांचा तुलनात्मक अभ्यास यातून होईल.

 1. प्रयोगासाठी अर्धा ते एक एकर जमीन सोडावी लागेल.
 2. त्यांनी पिकाच्या वाढीचे बारीक निरीक्षण करावे लागेल.
 3. या क्षेत्रावर त्यांचे आर्थिक अवलंबीत्त्व नसावे.
 4. या प्रयोगाचा सर्व खर्च सोसण्याची तयारी असावी लागेल.
 5. अशा चाचणीसाठी निश्‍चित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन करावे लागेल.
 6. दिलेल्या नमुन्यात नियमित माहिती भरावी लागेल.
 7. शास्त्रज्ञांशी संवाद करून माहिती, खुलासा, लोकांना उत्तर द्यावे लागेल.

प्रयोगाच्या गरजा

 1. एक सारखी जमीन असावी
 2. तीन भागात विभागली जावी
 3. जवळपास कापूस पीक असू नये
 4. तिन्हीत एकाच वेळी, एकाच पद्धतीने पेरणी
 5. दोन प्लॉटमध्ये 6 फूट अंतर असावे
 6. एकात एचटीबीटी, दुसर्‍यात बीटी, तिसरा देशीवाण
 7. तिन्ही प्लॉटमधील ओळी आणि झाडांचे अंतर सारखे
 8. खते, कीटकनाशके, तणनाशके, सिंचन यांचा वापर सारखा असेल
 9. कीडीच्या प्रादूर्भावाचे प्रमाण आणि व्याप्तीची नोंद ठेवणे
 10. झाड निहाय फुलोरा आणि बोंडाची नोंद

वरील प्रमाणे होणार्‍या प्रयोगात भाग घेऊन किसान सत्याग्रहाला योगदान करू इच्छिणार्‍या शेतकर्‍यांनी ताबडतोब माझ्याशी संपर्क साधावा.

लेखक : अजित नरदे,
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग प्रमुख, शेतकरी संघटना
18 अ, श्रद्धा संकुल, 6 वी गल्ली, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
मो.नं. 98224 53310

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*