असमाधानकारक पाऊस तरीही 300 चाराछावण्या बंद..!

अहमदनगर :
जिल्ह्यात नुकताच पाऊस झाला. शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शहरवासीयांच्या दृष्टीने तो खुप पाऊस होता. पण ग्रामीण भागाच्या मानाने फक्त पेरणी सुरू करता येईल ईतका पाऊस होता. कोरड्याफट पडलेल्या जमिनीवर पाऊस पडला आणि जमिनीसोबत बळीराजाचे डोळेही ओलावले. पण राज्य सरकारने मात्र खुप पाऊस झाला अविर्भावात तब्बल 300 चारा छावण्या आणि दीडशे टँकर बंद केले आहेत.

गेल्या दहा दिवसात अचानकपणे छावण्या टँकर बंद झाल्यामुळे बळीराजाची झोप उडाली आहे. पेरणीसाठी बियाने आणायचे का जनावरांला चारायला न्यायचे…चारायला नेले तरी चारा कुठंय? त्यातंय बियाणे महागले आहे अशा कठीण परिस्थितीत टँकर बंद झाल्यामुळे अगदी पिण्याच्या पाण्याचेही हाल सुरू झाले आणि दुष्काळात जी परिस्थिती होती तीच परत झाली. फक्त कोरड्या जमिनी ओल्या झाल्या एवढाच काय तो फरक.

दहा दिवसाच्या पावसात लगेच चारा निर्माण झाला का? पाऊस आला लगेच विहीर तुडूंब भरून पाणीप्रश्न संपला का? शेतकर्यांमधे प्रचंड संतापाची भावना आहे. आता यावर जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*