Blog | बांगलादेशात बीटी ब्रिन्जल जोमात

आपल्याकडे सध्या एचटीबीटी कॉटन लागवड करू की नये, यासाठीच खल सुरू आहे. शेतकरी संघटनेने तंत्रज्ञान स्वातंत्र्याची मागणी करीत याप्रकरणी सविनय कायदेभंग आंदोलन हाती घेतले आहे. त्याला विदर्भात मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर, आपल्या शेजारच्या बांगलादेश या राष्ट्रात कापूस, मका, वांगे आणि सोनेरी भात (गोल्डन राईस) या जेनेटिकली मॉडिफाइड पिकांची जोमाने लागवड होत आहे. अशावेळी बांगलादेशात सध्या काय सुरू आहे. हे सांगितले आहे कृषी विषयाचे अभ्यासक विशाल केदारी यांनी…

बांगलादेशातील ३६ जिल्ह्यात बीटी वांग्याची लागवड
वेगाने विकास करणाऱ्या देशांमध्ये बांगलादेशाचेही नाव घेतले जाते. बांगलादेशाच्या कृषी धोरणांमध्ये अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. बदलत्या धोरणानुसार येथे बीटी वांग्याच्या लागवडीला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ३६ जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी बीटी वांग्याची लागवड केली आहे.

बीटी वांग्याचे वाण खालीलप्रमाणे
१) बाई बीटी (उत्तरा)
२) बारी बीटी (काजला)
३) बारी बीटी (नयंत्रार)
४) ISD006 बीटी बारी

बीटीची सुरवात
बांगलादेशातील बीटी वांग्याच्या लागवडीला राजशेही, रंगपूर, पाबणा व गाझीपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. सन २०१४ पासून बांगलादेशात बीटी वांग्याची लागवड होत आहे. सध्या जगभरातील २९ देशांनी बीटी वाणांचा स्विकार केला आहे. बीटी वांग्याच्या यशस्वी लागवडीमुळे, बीटीचा स्विकार करणाऱ्या २९ देशांच्या यादीत बांगलादेशचा समावेश झाला आहे.

इतर बीटी वाणांच्या चाचण्या
बांगलादेशात २०१६ मध्ये कृषी संशोधन परिषदचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ‘अ ‘ जिवनसत्वयुक्त असलेला गोल्डन राईस, बीटी बटाटा व बीटी कॉटनच्या चाचण्या घेण्यास परवानगी देण्यात आली.

बीटी कापसासाठी कृषी मंत्री बेगम मतींचा पुढाकार
बांगलादेशाच्या संसदेत कृषी मंत्री बेगम मती चौधरी यांनी बीटी संदर्भातील देशाचे धोरण स्पष्ट केले. आगामी काळात बांगलादेशातील कापूस उत्पादनास चालना देण्यासाठी अनुवांशिक सुधारित कापूस किंवा बीटी कापसाची लागवड करण्यास पुढाकार घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. देशात बीटी कापूस लागवडीला सुरवात झाली आहे.

कापूस विकास मंडळाचा पुढाकार
बीटी कापसाच्या प्रसारासाठी कापूस विकास मंडळाने (सीडीबी) पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी बीटी कापसाची लागवड करावी या उद्देशाने विविध भागात डेमो प्लांट तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना डेमो प्लांट दाखवण्यासाठी कृषी सहलींचे अयोजन केले जात आहे

लेखक : विशाल बाबासाहेब केदारी
(कृषी विषयाचे अभ्यासक)
मो. क्र. : ७७१९८६००५८

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*