बिझनेसवाला | करा नैसर्गिक पालेभाज्यांच्या विक्रीचा व्यवसाय

निश्चितच मला तुम्हाला शेती करायला सांगायचे नाही! नैसर्गिक पालेभाज्यांचा उद्योग ही यापेक्षा व्यापक संकल्पना आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आणि कीटकनाशकामुळे स्वयंपाकातील पालेभाज्यांचा दर्जा खालावत आहे. कारखान्यांच्या घाणीने प्रदूषित झालेले पाणवठे आणि रासायनिक खते-कीटकनाशके यांच्या फवारणीमुळे या पालेभाज्या लोकांच्या आरोग्याचे बारा वाजवत आहेत. घसरलेल्या दर्जा मुळेच भारताचा या क्षेत्रातला निर्यातीचा टक्‍का घसरलेला आहे. आंतरराष्ट्रीय मानकांपूढे भारतातील पालेभाज्या अनुत्तीर्ण होतात.

बदलती जीवनशैली आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक गंभीर समस्या यामुळे लोक स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत सजग होत आहेत. आरोग्यदायी जीवन आणि आरोग्यदायी जेवण या गोष्टींना लोक आता महत्त्व देत आहेत. या गोष्टीमुळेच नवीन व्यवसाय संधींचा उगम होत आहे. शहरातल्या जिम्स खचाखच भरलेल्या असणे हे त्याचेच परिणाम आहे. रासायनिक घटक विरहित आणि जीवनसत्त्वे आणि प्रथिनांनी भरपूर पालेभाज्यांची ह्या वर्गाकडून मागणी होत आहे. तुम्ही ह्या वर्गाला नैसर्गिक आणि दर्जेदार पालेभाज्या पुरवण्याचा व्यवसाय करू शकता.

याबाबत तुम्हाला कीटकनाशक विरहित पालेभाज्या पुरवण्यासाठी शेतकऱ्यांशी बोलणी करावी लागेल. पालेभाज्या तील घटक पदार्थांचे प्रमाण काटेकोरपणे तपासावे लागेल. पालेभाज्या तील विषारी घटक ओळखण्यासाठी चाचणी उपकरणे घ्यावी लागतील. शहरातील जीम्स, हेल्थ क्लब, स्पोर्ट्स क्लब आणि दवाखान्यामध्ये तुम्हाला हवे असलेले ग्राहक भेटू शकतात. त्यांच्याशी तुम्ही मासिक किंवा योग्य कालावधीसाठी ठराव करू शकता. भाज्या गुणवत्तापूर्ण असल्याने तूम्हाला यात किमती जास्त ठेवून चांगले मार्जीन मिळवता येईल. पालेभाज्यांच्या नैसर्गिक असण्याच्या बाबतीत तुम्हाला ग्राहकांना आश्वस्त करावे लागेल. एखाद्या स्टोअरवर किंवा घरपोच या दोन्ही पद्धतीने हा व्यवसाय केला जाऊ शकतो!

लेखक : शेख रियाझ, बिजनेसवाला, लातूर
मो. 7378926295

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*