शेतकऱ्यांसाठी ‘ब्लॉकचेन टेक्निक’..!

पुणे :

जगभरात एका बारकोड क्लिकवर कृषी निविष्ठांची सर्वांगीण माहिती देणारी ब्लॉकचेन टेक्निक वापरली जात आहे. भारतात मात्र अजूनही असे तंत्र लागू करण्यात आलेले नाही. मात्र, आता महाराष्ट्रातील कृषी विभाग हेच अत्याधुनिक तंत्र शेतकरी बांधवांसाठी खुले करणार आहे. त्याबद्दलचे सुतोवाच कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अधिवेशनात दिवसे बोलत होते. शेतकरी कर्ज काढून किंवा प्रसंगी घरातील दागदागिने विकून निविष्ठा (खते, कीटकनाशक, यंत्र, औजारे आदि) खरेदी करतात. मात्र, त्यासाठी त्यांना फ़क़्त कृषी सेवा केंद्रचालक, कंपन्यांचे प्रतिनिधी किंवा जाहिराती यावरच विश्वास ठेवावा लागतो. त्यातूनच अनेकदा नको असलेल्या कृषी निविष्ठांवर बेसुमार खर्च होऊन शेती तोट्यात जाते. हेच टाळण्यासाठी ब्लॉकचेन टेक्निक उपयोगी ठरेल, अशी अशा कृषी विभागाला आहे. सिंगापूर येथील कंपनीच्या मदतीने हे तंत्र शेतकऱ्यांसाठी खुले केले जाणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*