कांदा वधारला; सरासरी रु. १५/किलो भाव

पुणे :

राज्यभरात पावसाचा जोर म्हणावा असा नसतानाच पश्चिम महाराष्ट्रात महापुराची स्थिती आहे. त्याचाच परिणाम म्हणून कांद्याचे भाव थोडे वधारले आहेत. सध्या राज्यभरात बाजार समितीमध्ये ग्रेड वन कांद्याचे भाव सरासरी १५ रुपये किलो स्थिरावले आहेत.

उन्हाळ कांद्याचे भाव वधारल्याने उत्पादकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, भविष्यात काय स्थिती राहणार व सरकारने जर कांदा आयात केली तर भाव कसे राहणार याचे कोडे अजूनही सुटलेले नाही. राज्यभरातील प्रमुख बाजार समितीमधील कांद्याचे प्रतिक्विंटल भाव असे :

भाव (किमान-कमाल-सरासरी) याप्रमाणे : खेड-चाकण ६५०-१७००-१३००, जळगाव ५५०-१६७५-११२५, नागपूर ११००-१६००-१४७५, पुणे ८००-१६००-१५५०, लासलगाव ८००-१७००-१५००, चांदवड १०००-१६५१-१५५०, मनमाड ७००-१५५२-१४०० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*