डाळिंब प्रतिकिलो १५० रुपये

पुणे :

सध्या बाजारातून सर्व सिझनल फळे गायब असल्याने डाळिंबाचे अच्छे दिन आलेले आहेत. सध्या पुणे येथील गुलटेकडी बाजारात १२० तर, राहता (अहमदनगर) या मोठ्या मार्केट यार्डमध्ये भगवा डाळींब फळाला १५० रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहेत. सरासरी भाव सध्या ६०-७० रुपये किलो स्थिरावले आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील भगवा डाळिंब फळाचे प्रतिक्विंटल (१०० किलो) बाजारभाव (किमान-कमाल-सरासरी) असे : पुणे २०००-१२०००-६०००, पंढरपूर १५००-७९००-४४००, राहता १०००-१५०००-६५००, जुन्नर २५००-१५५००-५०००, संगमनेर २५००-८५००-४५०० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*