हवामानानुसार क्रॉप इफिशियंट झोन..!

मुंबई :

कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याच्या हवामानानुसार पीक कार्यक्षमता क्षेत्र (क्रॉप इफिशियंट झोन) तयार करून त्यानुसार वाण,उत्तम शेतीपद्धती, प्रति हेक्टरी उत्पादन खर्च व उत्पन्न मापक निश्चित करण्यात यावे. याचा पीकविमा भरपाईवेळी लाभ होईल. तसेच सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी निती आयोगानुसार शिफारस करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे पुढील उपाययोजना करण्यात याव्यात. उन्नत भारत अभियान आपल्या कृषी विद्यापीठांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे निर्देशही  कृषीमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

कृषी विद्यापीठांनी वेळोवेळी केलेल्या संशोधनांची मार्गदर्शक तत्वे व सूचना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात तसेच एकात्मिक शेतकरी कल्याण प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा. प्रत्येक जिल्ह्याचे हवामान लक्षात घेऊन मंडळनिहाय पीक पद्धती व उत्पादकता याबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असे निर्देश कृषी मंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच कृषी विद्यापीठांनी केलेल्या संशोधनामुळे शेतीच्या उत्पादनात वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, दापोली विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत त्याचबरोबर कृषी परिषदेचे संचालक, कृषी विद्यापीठांचे संचालक, संशोधक तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*