तो गाळ शेतात टाका; केसरकर यांचे निर्देश

मुंबई : 

अतिवृष्टीमुळे नद्यांनी पात्र बदलल्यामुळे तसेच पाण्यामुळे वाहून गेलेल्या शेतजमीनीसंदर्भात दिलासा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नदीतील गाळ व दगड माती काढून नदीचा प्रवाह पूर्ववत करण्याचे व नदीचा प्रवाह बदलल्याने वाहून गेलेल्या ठिकाणी मातीचा भराव टाकून जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळातून नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत पोकलेन, डंपर, आरी, इत्यादी सुमारे  2 कोटी रुपयाची मशीनरी खरेदी करण्यात आली असून, सदर मशिनरी पाटबंधारे यांत्रिकी विभाग यांच्या ताब्यात असून सदर विभागामार्फत गाळ काढण्याचे काम करावे. अधीक्षक अभियंता, जलसंपदा व जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी या नदीच्या खोलीकरणाची अंदाजपत्रके तयार करावे असे निर्देश यावेळी श्री. केसरकर यांनी दिले.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*