गुंडेगावात आठवडे बाजारास सुरुवात

अहमदनगर :

ग्रामीण भागात उत्पादित होणारा माल शेतकरी ते ग्राहक यांना उपलब्ध व्हावा तसेच या माध्यमातून कमी खर्चात व विना कमिशन मालाची विक्री होऊन शेतकर्‍याच्या मालाला रास्त भाव मिळावा म्हणून आदर्श गुंडेगाव येथे रविवारी आठवडी बाजार सुरू करण्यात आला आहे. 

गाव व परिसरातील सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादित होणारा धान्यादी माल, शेतात उत्पादित झालेली नैसर्गिकरीत्या पिकवलेली ताजी फळे, कडधान्ये तसेच इतर शेती व संसारोपयोगी मालाचा बाजार गावांमध्ये भरविण्यातआला होता. या सुविधेमुळे पहिल्याच प्रयत्नात गावात असलेली भली मोठी जागा कमी पडली. जेवढ्या मोठ्या प्रमाणात बाजार भरला तेवढ्याच प्रमाणात ग्राहकांनी मालाची खरेदी करून भरघोस प्रतिसाद दिल्याने शेतकरी विक्रेत्यांनी, तसेच ग्राहकांनी शेतात उत्पादित झालेला विना रसायन व ताजा माल मिळाल्याने आनंद व्यक्त केला.
गुंडेगाव येथे आठवडी बाजार सुरू होण्याकरता गावचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, उपसरपंच संजय कोतकर, सरपंच पल्लवी कुताळ प्रयत्नशील होते. याप्रसंगी शिवनाथ कोतकर, डॉ. हनुमंत कुताळ, सुनील भापकर, मंगेश हराळ, वामनराव जाधव, पंडित हराळ, झुंबर भापकर, मोहन येठेकर, अशोक पिंपरकर, सर्जेराव माने, वसंत भापकर, प्रदीप भापकर, दशरथ जावळे, रमेश माने, चंद्रकांत निकम, भवानीप्रसाद चुंबळकर, आजिनाथ कासार, गोरख माने, भाऊसाहेब जावळे, उषा जाधव, खंडू भिसे, राजेंद्र मोहिते, ग्रामसेवक गोवर्धन राठोड आदी उपस्थित होते. आठवडा बाजारामुळे वलघुड, कामठी, राळेगण, कोरेगाव, देऊळगाव या गावातील शेतकर्‍यांना माल विक्रीतील खरेदीची सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातून व गावातून अभिनंदन करण्यात येत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*