वांगे वधारले; कोल्हापुरात ७५ तर, रत्नागिरीत ८० रु./किलो

पुणे :

जास्त पाऊस झाल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्रात कांद्यासह टाॅमेटो व वांग्याचेही भाव वधारले आहेत. सध्या कोल्हापुरात घाऊक बाजारात वांगे प्रतिकिलो ७५, तर रत्नागिरीत ८० रुपये विकले जात आहे. किरकोळ बाजारात येथे वांगे थेट १०० रुपये प्रतिकिलो असे भाडकले आहेत.

राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील वांगी पिकाचे घाऊक बाजारभाव पुढीलप्रमाणे : (भाव प्रतीक्विंटल रुपयांत किमान-कमाल-सरासरी) अकलूज २२००-३२००-३०००, कोल्हापूर १०००-७५००-४२५०, औरंगाबाद२५००-३०००-२७५०, सातारा ४०००-५०००-४५००, कल्याण ३०००-३२००-३१००, जळगाव २०००-४०००-३०००, पुणे ३०००-४०००-३५००, नागपूर ४०००-४५००-४३७५, वाई ४०००-५०००-४७००, कामठी २०००-४०००-३५००, रत्नागिरी ४०००-८०००-६२०० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*