कांदा भडकला; पुणे मार्केटला रु. ३०००/क्विंटल भाव

पुणे :

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी मार्केटमध्ये कांद्याची पुन्हा एकदा चालती आहे. शनिवारी याचीच झलक दाखवीत कांद्याने थेट ३००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मजल मारीत आपला भाव कमी होणार नसल्याचा संदेश दिला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी कांद्याची ११ हजार ४८० क्विंटल आवक झाली. भाव २३०० ते २७०० रुपये असतानाच सरासरी खरेदी-विक्रीचा भाव २५०० रुपयांवर आला आहे. पुण्यातील मोशी येथे ३००० रुपये क्विंटल भाव मिळाला.

मुंबईत कालच्या तुलनेत कांद्याचे भाव १०० ते २०० रुपये क्विंटलने कमी झाले. शेतकऱ्यांसाठी शुक्रवारचे (दि. ३०/०८/२०१९) कांदा बाजारभाव (किमान-कमाल-सरासरी) असे : कोल्हापूर १०००-२७००-२४००, औरंगाबाद १०००-२२००-१६००, कराड २०००-२६००-२६००, जळगाव १०५०-२६७५-१८५०, मालेगाव-मुंगसे ८५०-२५८०-२४००, चांदवड ६५३-२४९९-२३५०, पिंपळगाव बसवंत-सायखेडा ५५०-२४००-१९५०, वैजापूर १३००-३०००-२३५० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*