शिफारस केलेल्या फळपिकांच्या वाणांचा वापर करावा : कृषी विभाग

मुंबई :

सिताफळ व सर्व फळपिकांकरिता कृषी विद्यापिठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर शेतकऱ्यांनी करावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

शेतकरी फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. तथापि सुरुवातीच्या तीन ते पाच वर्षाच्या फळधारणापुर्व कालावधीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुक करावी लागते. फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत काहीही सांगता येत नसल्याने कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणांचा वापर केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधून कृषी विद्यापीठांनी शिफारस न केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करु नये, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*