खर्च कमी करण्याचा फंडा शिका; २२ सप्टेंबरला कृषी निविष्ठा प्रशिक्षण कार्यशाळा

अहमदनगर :

शेतीमधील खरे दुखणे आहे, जास्त उत्पादन घेण्यासाठी होणारा अतिरिक्त खर्च. आधुनिक काळात त्याची गरज आहे. मात्र, तरीही अशी अनेक औषधे व कृषी निविष्ठा आहेत, ज्यांचे उत्पादन कमी खर्चात करून शेतीमध्ये वापरता येतात. त्याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना नसल्याने त्यांना जास्त किमतीने विविध कंपन्याकडून औषधे खरेदी करावी लागतात. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याच्या हेतूने बायोम टेक्नोलॉजीज यांनी दि. २२ सप्टेंबर २०१९ ला कृषी निविष्ठा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. त्यामुळेच बायोम टेक्नोलॉजीज यांनी न्यू इज अॅग्रोनाॅट बायो स्टिम्युलंट, पीजीआर अँड आॅरगॅनिक फर्टिलायझर यांच्यावर ही कार्यशाळा आयोजित केली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत केडगाव इंडस्ट्रीअल एरिया (नगर-पुणे हायवे, केडगाव, अहमदनगर) येथे हे प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये लिमिटेड सीट्स असून अगोदर नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

बायोम टेक्नोलॉजीजचे संस्थापक डॉ. प्रफुल्ल गाडगे (पीएचडी (बायोकेमिस्ट्री), सहयोगी सदस्य आयएफओएएम आॅरगॅनिक इंटरनॅशनल) हे यावेळी सविस्तर मार्गदर्शन करतील. डॉ. गाडगे हे कृषी रसायन संशोधक म्हणून अनेक कंपन्यांचे सल्लागार आहेत. तसेच विषमुक्त शेतमाल परदेशात निर्यात करण्यासाठीही ते करार पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांना मोठी मदत करीत आहेत. या प्रशिक्षणासाठी संस्थेने १५,००० रुपये नोंदणी शुल्क ठेवले आहे. त्यात कोर्स मटेरीअल, डाॅकुयुमेंटेशन आणि पेन ड्राइव्ह आदीसह चहा, नाश्ता आणि जेवण या सेवा देण्यात येतील.

औषधांचे मिश्रण व द्रावण तयार करणे, प्रयोगशाळेची उभारणी व क्वालिटी कंट्रोल, लेबल क्लेम, नियमन व व्यवस्थापन मार्गदर्शन, उत्पादन व विक्रीची प्रक्रिया आणि नियोजन, प्रमाणीकरण आणि मानके यांचे नियम आदि विषय या दिवसभरात शिकवून प्रश्नोत्तरे होतील. या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी श्री. संदीप देशमुख (मो. 9823981942 / 8329828190 / 8378878870) किंवा service@inventbiome.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन बायोम टेक्नोलॉजीज यांनी केले आहे. शेतकऱ्यांसह कृषी सेवा केंद्रचालक, कृषी निविष्ठा उत्पादक, पिक सल्लागार व व्यावसायिक या सर्वांसाठी हे प्रशिक्षण महत्वाचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*