तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार

पुणे :
विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राज्यभरात राष्ट्रवादी मेळावे व सभा घेत आहे. अकोल्यातील सभेत बोलताना पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ता दिल्यास पुढील सहा महिन्यात संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा केली.

त्यावर ट्विट करताना त्यांनी म्हटले आहे की, “राज्यात आमचं सरकार आणा. मी शब्दाचा पक्का आहे. पहिल्या ६ महिन्यांत संपूर्ण कर्जमाफी नाही दिली तर, पवारांची औलाद सांगणार नाही! माझ्या कार्यकाळात अकोल्यासाठी शक्य ती सर्व कामं प्रामाणिकपणे केली. निवडून दिलंत तर, यंदा अकोल्यात विजयाचा गुलाल उधळायला येईन!”

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*