कांद्याबाबतचा निर्णय म्हणजे पोरखेळ : राजू शेट्टी

पुणे :
कांदा निर्यातीसंदर्भात केंद्र सरकारने पुन्हा एकदा घेतलेला निर्णय म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील दरांची तुलना केली तर कांदा निर्यात होणे सध्या सहजशक्य नाही. आयात-निर्यात धोरण स्थिर असावे लागते. भाजपचे सरकार शेतकऱ्याला मातीत घालायला निघाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेतीची यांनी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, केंद्राने निर्यातमूल्य वाढवून पुन्हा कांदा निर्यात थांबवली आहे. अशावेळी पुढील महिन्यात खरिपाचा कांदा बाजारात आला की, शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होणार हे निश्चित आहे. आयात निर्यातीचं धोरण स्थिर असावं. ज्यामुळे शेतकऱ्यांना निर्यात करताना फायदा होईल, अशी मागणी आम्ही यापूर्वीही केली आहे. शेतकरी रस्त्यावर कांदा फेकत होते तेव्हा कांदा खरेदी करण्यात आला नाही आणि आता ही बंदी घालण्यात आली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*