
देशात सध्या कोणात्या आघाडीवर काय चालू आहे, आणि भविष्यात काय होणार आहे, याचा काहीच ताळमेळ नसल्याचे अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय भाष्यकार सांगत असतात. अशा भाष्यकारांना खोटे ठरविणे, त्यांचे वैचारिक मूळ आणि कुळ (जात, धर्म व प्रदेश) काढून ट्रोल करणे यामध्ये भारतीय ट्रोलर्सचा हातखंडा आहे. देश बदल रहा है, आगे बढ रहा है.. असले दाखले हे ट्रोलर्स देताना दिसतात. मात्र, आता देशाचा खऱ्या अर्थाने काय मूड आहे, यावर मुडीज संस्थेने शिक्कामोर्तब केले आहे. जे देशासाठी सकारात्मक अजिबात नसून थेट नकारात्मक आहे..!
लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, krushirang.com
यंदाच्या वर्षीचे नोबेल परितोषिक विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केल्यानंतर सत्ताधारी भाजपच्या ट्रोलर्स मंडळींनी सोशल मिडीयावर उच्छाद मांडला होता. अनागी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या बड्या नेत्यांनी बॅनर्जी यांना खोटे ठाराविण्याचा विडा उचलत देश वेगाने प्रगती करीत असल्याचे भासविण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, त्यालाच छेद देणाऱ्या घडामोडी व आकडेवारी सध्या देशभरातून प्रसिद्ध होत आहेत. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही देशाची आर्थिक स्थिती स्पष्ट कारांरी आकडेवाडी प्रासिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे.
भारताच्या विकासाचा आणि आर्थिक सुधारणांचा दर पुढील काही काळ संथ राहील, अशी शक्यता व्यक्त करताना मूडीज संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचा स्थैर्याचा (स्टेबल) हा दर्जा काढून घेतला असून, आता नकारात्मक (निगेटिव) हा खालच्या स्थानी ढकलले आहे. अशावेळी फिच व एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज या संस्थांनी मात्र अद्याप स्थिर अर्थव्यवस्था याच गटात भारताला ठेवले आहे, हीच ती काय चांगले म्हणवून घेण्याची संधी देणारे घडलेले आहे. आताही त्याचाच दाखला देत ट्रोलर्स सक्रीय होण्याची शक्यता आहे.
आर्थिक मंदीशी सामना करण्यासाठी भारताने धोरणे आखली, पण त्यांची नीट अंमलबजावणी मात्र झाली नाही, असेच आतापर्यंत अनेक अर्थतज्ञांनी म्हटले आहे. मूडीज या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार संस्थेने त्यावरच शिक्कामोर्तब केले आहे. भारतात अशा वातावरणात अपेक्षेप्रमाणे आर्थिक गुंतवणूक होत नसतानाच वाहन उद्योगातील मंदी, रिटेल व्यवसायात होत असलेली घट, घरांना नसलेली मागणी आणि मोठे उद्योग अडचणीत येणे या साऱ्याला नॉन बँकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्यूट्सची आर्थिक चणचण निर्माण झाल्याकडे मुडीजने लक्ष वेधले आहे.
जीडीपीचा वेग कामी झाल्याने या आर्थिक वर्षाअखेरीसमार्च अर्थसंकल्पीय तूट ३.७ टक्क्यांपर्यंत जाईल, असे मूडीजने म्हटले आहे. सरकारने अर्थसंकल्पीय तुटीचे लक्ष्य ३.३ टक्के ठेवले होते. गेल्याच महिन्यात मूडीजने भारताचा जीडीपीच्या अंदाजातही घट केली होती. आधी मूडीजने जीडीपी ६.२ टक्के असेल, असे म्हटले होते. पण आॅक्टोबरमध्ये तो ५.८ टक्के इतका असेल अशी शक्यता मूड बदललेल्या मुडीज संस्थेने जाहीर केली आहे.
नेहमीप्रमाणे भारताने अशी स्थिती नसल्याचे सांगून देश आगे बढ रहा है.. असे ठासून सांगितले आहे. गुंतवणूक वाढावी, यासाठी उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात भारताला यश येत आहे. कॉर्पोरेट करातील कपातीमुळे वित्तीय तूट वाढण्याची शक्यता असली तरी त्यामुळे उद्योगांना चांगले दिवस येतील आणि त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल, असा ठोस दावा भारताचा आहे.
Be the first to comment