‘उन्हाळी’बरोबर लाल कांद्याचीही चांदी; पहा आजचे बाजारभाव

पुणे :

पूर परिस्थिती आणि ओल्या दुष्काळाने कांद्याचे पिक सरासरीपेक्षा कमी उत्पादित होणार आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समितीत ग्रेड वन उन्हाळी कांदा ६० ते १०० तर, लाल कांद्याला ४० ते ७५ किलो रुपये असा दमदार भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.

राज्यातील प्रमुख बाजार समितीमधील लाल कांद्याचे प्रतिक्विंटल भाव असे (किमान-कमाल-सरासरी) : सोलापूर २००-११०००-३८००, धुळे ३००-७५००-५०००, लासलगाव १८००-६०००-५४००, जळगाव १०००-५५००-३०००, नागपूर २५००-७०००-५८००, राहुरी १०००-६०००-४५००, मनमाड १०००-५२००-४५००, नेवासा १०००-५५००-३०००, इंदापूर १०००-८१००-२४००, देवळा २५००-६०००-४५००, उमराने ११००-६४००-४३००, अमरावती ४०००-५०००-४५००, पुणे ३०००-७०००-४०००, शेवगाव ३५००-७०००-३५००, मुंबई ६०००-७०००-६८००० आदि.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*