स्पेनमधील परिषदेत ठरणार पर्यावरणीय दिशा..!

दिल्ली :

ब्राझील देशात नोयोजित असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान परिषद अखेर आता स्पेन या देशातील माद्रिद या शहरात होत आहे. दि. २ ते १५ डिसेंबर २२०१९ या कालावधीत होणाऱ्या या परिषदेत काय निर्णय होतात आणि कोणता व किती देश त्यात सकारात्मक विचाराने सहभागी होतात यावर जगातील शेती व पर्यावरण यांची दिशा स्पष्ट होणार आहे.

जगभरात आता हवामान आणीबाणी (climate emergency) लागू झालेली आहे. आतापासून काहीतरी ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली तरच खऱ्या अर्थाने २०६० या वर्षापर्यंत जागातील पर्यावरण संतुलित होण्यासाठी चालना मिळणार आहे. मात्र, अमेरिका व ब्राझील या देशांसारख्या आडमुठ्या देशांमुळे पर्यावरणीय बदलाचे काय होणार यावरच या परिषदेचे खऱ्या अर्थाने यश ठरणार आहे.

युरोपीय संसदेने जागतिक हवामान व पर्यावरणीय बदल याची आणीबाणी स्थिती असल्याचे मान्य केले आहे. तिथे ४२९ विरुद्ध २२५ अशा बहुमताने हा ठराव मंजूर झाला आहे. युरोपीय देशांनी २०५० पर्यंत हरितगृह वायूचे (कार्बन उत्सर्जन) शून्यावर आणण्याचे आवाहन करीत या परिषदेत सकारात्मकता आणली आणली आहे. त्यामुळेच आता इतर देश काय भूमिका घेतात, यावर या परिषदेचे यशापयश ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*