Blog | कांदापुराण माध्यमांचे आणि सामन्यांचे..!

कांदा शंभरीपार होऊनही जनतेतुन कुठलाही विरोध होताना दिसत नाहीये. मुख्यत्वे शेतकरी वर्गाला (म्हणजे शेतकरी नेत्यांना) प्रचंड तिरस्कार असलेल्या शहरी ग्राहकांतुनही कुणी कांदा भाववाढीबद्दल काही बोलताना दिसत नाहीये.
याचे मुख्य कारण आहे कांदा विषयावर गप्प असलेले न्युज चॅनल्स. न्युज चॅनल्स‌नी जर उद्यापासुन कांद्याचे भाव वाढल्याबद्दल आकतांडव सुरु केले तर अचानक सगळीकडे महागाईची चर्चा भडकलेली दिसेल. म्हणजेच ग्राहक वर्गाची क्रयशक्ती चांगली आहे. शहरात ग्रामीण भागापेक्षा भाजीपाला बऱ्याचदा ३०-४०% महाग भेटतो तरिही शहरी ग्राहकांतुनही विशेच चर्चा दिसत नाहीये. कारण भावात‌ होणारा चढ उताराचं त्यांनाही भान आहेच. कोणती गोष्ट कधी आणि कितीमधे मिळणे योग्य असते‌ याचा ग्राहकाला नेहमीच अंदाज असतो. पण याच‌ ग्राहकांना जे दर योग्य वाटतात तेच दर महाग वाटावेत यासाठी हे न्युज चॅनल्स काम करतात. एकअर्थी लोकांच्या मेंदुशी हे चॅनल्सवाले खेळत असतात. जी गोष्ट बिलकुन महाग नाही, उलट अपेक्षेपेक्षा स्वस्तच आहे, ती‌‌ गोष्ट बळजबरी महाग दाखुन त्यावरुन वातावरण पेटवणं, ग्राहकांना भडकवणं आणि शेवटी सरकारला त्या विषयात दखल द्यायला भाग पाडणं हा मीडियाचा आवडता खेळ आहे. पण मीडियाच्या या खेळात शेतकऱ्यांचं दिवाळं निघतं. मीडियाच्या या वागण्याला साॅफ्ट पावर म्हटलं जातं. सरकारवर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव निर्माण करुन आम्हाला संभाळणं तुमच्यासाठी किती आवश्यक आहे हे सरकारला सांगण्याचा तो प्रयत्न असतो. यासोबतच ईथल्या मोठ्या नेत्यांचे बाहेर देशात असलेले मोठमोठे गोडाऊन, ते भरेपर्यंत निर्यात‌ चालू ठेवायची आणि त्यानंतर शाॅर्टेज करुन आयात सुरु करायची हा आपल्या देशात कित्येक वर्षांपासुन चालु असलेला व्यवहार. यातही मीडियाचा सक्रीय सहभाग असतो. सध्या न्युज चॅनल्स कांदा दरवाढीबद्दल शांत आहेत. कदाचीत सरकारकडून तशी ताकीद मिळाली असण्याची शक्यता आहे. आता काहीजण लगेच शेतकऱ्यांकडे कांदा कुठे आहे असं म्हणतील पण शेतकऱ्यांकडेही कांदा आहे आणि व्यापाऱ्यांकडेही आहेच.
मुख्य प्रश्न असतो‌ तो म्हणजे प्रत्येकाला त्यांच्या गुंतवणुकीवर पुरेसा नफा मिळण्याचा, त्याच्या कष्टाचा पुरेसा परतावा मिळण्याचा. तो मिळणे महत्वाचे. मग समोर व्यापारी असो किंवा शेतकरी. सरकारनियंत्रण मुक्त मार्केट शेतकऱ्यांसाठी किती आवश्यक आहे हे सध्याच्या परिस्थितीत उदाहरणासहीत अनुभवायला मिळतंय. आयुष्य चांगलं आहे, फक्त न्युज चॅनलवाल्यांनी काशी नाही केली पाहिजे. लेखक : श्रीकांत आव्हाड, पुणे
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*