नगरमध्येही कांदा शंभरीपार..!

अहमदनगर : गेली महिन्यापासून कांद्याचे भाव वाढत आहेत. दिवसेंदिवस कांद्याची आवक कमी असल्यामुळे कांद्याचे भाव चढ्या दराने वाढताहेत. नगर बाजार समितीच्या काल झालेल्या लिलावात कांद्याला 100 रुपये भाव मिळाला. काल जवळपास पंधरा हजार गोण्या कांदा विक्रीसाठी आणला गेला होता. देशभरातून कांद्याची मागणी असल्यामुळे व्यापाऱ्यांनी चांगला भाव दिला. तसेच यावर्षी कांद्याने विक्रमी उच्चांक गाठला असल्याचे बाजार समितीच्या पदाधिकाऱयांनी सांगितले. श्रीरामपूर बाजार समितीमधेही कांद्याला 85 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याचे वाढणारे भाव मात्र मध्यमवर्गीय कुटुंबे, होटेल्स आज मेसवाल्याना रडकुंडी आणले आहे. हॉटेल्स आणि मेस मध्ये कांदापोहे ऐवजी बटाटापोहे दिले जात आहेत तर ओनीयन उत्तप्पामध्ये कांदा गायब झाला आहे.
आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*