अहमदनगर :
स्पेनमधील माद्रिद येथे जागतिक हवामान परिषद राजकीयदृष्ट्या तापली असतानाच महाराष्ट्र राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलले आहे. अवकाळी पाऊस पुन्हा दाखल झाल्याने शेतकरी बांधवांची पळापळ सुरू झाली आहे.
अहमदनगर शहर व परिसरात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. सावेडी भागात ढग दाटून आले आहेत. त्यामुळे आता नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अवेळी पाऊस येतो, मात्र त्यालाही काही शास्त्र असतेच की.. तेच शास्त्रीय ताळतंत्र पावसाने सोडले आहे. त्यावर आता नागरिक चर्चा करीत आहेत.
यापूर्वी झालेल्या पावसाने महाराष्ट्र राज्यात मका व द्राक्षे पिकाची वाट लावली आहे. आताही गहू पेरणी सुरू होत असताना राज्यात उकाडा वाढला आहे. थंडी गायब झाल्याने गहू पेरणी करून काय होणार, याचे कोडे पडले आहे. त्यातच पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्ग जाम चिंतेत आहे.
पुणे :यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. त्याचवेळी उन्हाच्या वाढत्या कडाक्याने लिंबू पिकाचेही भाव ३०-४० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. उत्तर भारतातून दिल्लीसह आग्रा आणि जयपूर येथून अहमदनगर भागातील श्रीगोंदा [पुढे वाचा…]
अहमदनगर : कांद्याला मिळणारे भाव हळूहळू वाढू लागले आहेत. कर्नाटक व उत्तर भारतातील राज्यांमध्ये कांद्याची मागणी वाढल्याने बाजारात किंचित उठाव असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पारनेर बाजार समितीत सध्या सरासरी 22 कांदा गोण्यांची आवक होत आहे. [पुढे वाचा…]
अहमदनगर : नगरच्या जागेवरील वाद आणि प्रतिवाद यातच यंदाची लोकसभा निवडणूक राज्यभरात संपली. काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या बंडाळीने ही जागा देशभरात चर्चेत राहिली. येथून भाजपचे [पुढे वाचा…]
Be the first to comment