राज्यावर 6.71 लाख कोटी कर्जभार; कशी देणार सरसकट कर्जमाफी..?

मुंबई :
सुरवातीला राज्यावर साडेचार लाख कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती होती पण नवीन आलेल्या सरकारने सर्व चौकशी करताच साडेचार नव्हे तर तब्बल 6.71 लाख कोटी रुपये कर्ज असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. इतका कर्जभार असल्याने शेतकरी कर्जमाफी होणार की नाही, याबाबत साशंकता वाढली आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पात चुकीची माहिती सादर केली गेल्याचे समोर आले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात काही कोट्यवधी रुपयांचे काही प्रकल्प चालू आहेत. त्यापैकी समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन आणि इतर मोठ्या प्रकल्पाच्या कमासाठी हे कर्ज सदर काम करणाऱ्या कंपन्या काढत असतात. सदर कर्ज हे ऑफबजेट दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा घोळ झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकल्पांसाठी या कंपन्यांनी राज्य सरकारच्या संमतीनेच कर्ज काढले आहे. मात्र हे कर्ज राज्याच्या मूळ अर्थसंकल्पात दाखविले जात नाही. पण या सगळ्या गदारोळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार का, या कर्जाच्या ओझ्यामुळे ते शक्य होईल का? दुसरा पर्याय शोधला जाईल का? असे अनेक प्रश्न समोर आहेत. संसदीय कार्यप्रणालीचा अजीबात अनुभव नसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या प्रश्नांना कसे तोंड देतात हे पाहणे महत्वाचे आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*