ट्विटरवर कांदा ट्रेंडमध्ये; मजेशीर पोस्टिंग सुरू..!

पुणे :

कांदा ही प्रत्येकाच्या जीवनात दररोज खाण्या-चाखण्याची गोष्ट. मात्र, हाच कांदा आता थेट दीडशे रुपये किलो झाल्याने खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पाळले आहे. तर, विक्रेते शेतकरी त्यामुळे खऱ्या अर्थाने अच्चे दिन अनुभवत आहेत. याच परिस्थितीवर सध्या ओनिअन हा ट्विटर ट्रेंड जोरात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कांद्याला त्यांच्या कुटुंबात विशेष महत्व नसल्याचे म्हटल्यावर त्याची खिल्ली उडविणाऱ्या पोस्त येत आहेत. तसेच यापूर्वी कांद्याच्या भाववाढीने कसे सरकार कोसळले होते याच्या आठवणी करून देणाऱ्या पोस्टिंग जोरात आहेत. काहींनी तर डॉलरपेक्षा कांदा दुप्पट असल्याने कांदा खरेदीसाठी बँकांनी कर्ज देण्यास सुरुवात केल्याच्याही पोस्त केलेल्या आहेत.

एकूणच आता मुंबईत १५० रुपये किलोने कांदा भेटायला लागल्यावर आणि केंद्र सरकार अशावेळी हतबल झाल्यावर कांदा हा हसवणारा, रडवणारा आणि चेष्टा करण्याचाही विषय बनला आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*