विदर्भात १६ हजार ८६५ शेतकरी आत्महत्या..!

नागपूर :

विदर्भ म्हणजे कापूस व सोयाबीन पिकाचे आगार. मात्र, याच भागात आता शेतकरी आत्महत्यांचे सत्र जोरात सुरू आहे. सोयाबीन-कपाशीला मिळणारा तुटपुंजा भाव आणि हवामान बदलामुळे वाढलेल्या कीड-रोगाच्या फेऱ्यात अडकलेल्या या भागातील सहा जिल्ह्यांत मागील ९ वर्षांत १६ हजार ८६५ शेतकरी आत्महत्या झालेल्या असल्याची धक्कदायक आकडेवारी समोर आलेली आहे.

केंद्र सरकारमध्ये बदल होऊन भाजपचे सरकार आल्यावर २०१४ पासूनची आकडेवारी राष्ट्रीय स्तरावर देण्यास अघोषित बंदी आलेली आहे. मात्र, विदर्भातील सहा जिल्ह्यांची एकत्रित आकडेवारी लोकसत्ता या र=वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. त्यानुसार विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम व वर्धा या सहा जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र फोफावत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मागील फ़क़्त अकरा महिन्यात या भागात १००४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*